
भारतीय रॅप संगीताच्या जगात यो यो हनी सिंग आणि बादशाह ही दोन्ही नावे नेहमीच गाजतात. एकेकाळी माफिया मुंडीर (Mafia Mundeer) या एकाच ग्रुपचा भाग असलेले हे दोन मित्र आज एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनले आहेत.

बादशाह आणि हनी सिंग यांच्यात गाण्यांमधील चढाओढ आणि सोशल मीडियावरील वाद यामुळे ते नेहमीच चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या संपत्तीबद्दल कायमच चर्चा होत असते. या दोघांमध्ये जास्त श्रीमंत कोण याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

मध्यंतरी आजारपणामुळे हनी सिंग काही काळ इंडस्ट्रीपासून दूर होता. तरीही त्याची कमाई आणि संपत्ती आजही थक्क करणारी आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, हनी सिंगची एकूण संपत्ती सुमारे १८० ते २०० कोटी रुपये आहे.

हनी सिंग एका गाण्यासाठी ५० लाख ते १ कोटी रुपये मानधन घेतो असे म्हटले जाते. याशिवाय लाईव्ह कॉन्सर्ट आणि जगभरातील शोमधून त्याची मोठी कमाई होते.

हनी सिंगला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्या ताफ्यात ऑडी आर-८ (Audi R8), ऑडी क्यू-७, जॅग्वार आणि बीएमडब्ल्यू यांसारख्या गाड्या आहेत. त्यासोबतच पंजाबमध्ये त्याचे वडिलोपार्जित घर आहे. तसेच गुरुग्राम आणि दिल्लीतील उच्चभ्रू भागात त्याचे आलिशान बंगले आहेत.

बादशाहने बॉलिवूडमध्ये आपले भक्कम स्थान निर्माण केले. 'डीजे वाले बाबू' पासून ते 'गर्मी' पर्यंत त्याची अनेक हिट गाणी दिली. बादशाहची संपत्ती अंदाजे १०५ ते ११० कोटी रुपये आहे. सध्या तो हनी सिंगच्या मागे असला, तरी त्याची वाढती कमाई लक्षणीय आहे.

बादशाह एका गाण्यासाठी ३० ते ५० लाख रुपये चार्ज करतो. याशिवाय टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम करण्यासाठी आणि जाहिरातीमधून तो कोट्यवधी कमावतो. Badfit नावाचा त्याचा कपड्यांचा ब्रँड आहे. तसेच रेस्टॉरंट व्यवसायातूनही त्याला उत्पन्न मिळते.

बादशाहला महागड्या बुटांचा प्रचंड शौक आहे. त्याच्याकडे तब्बल दीड कोटी रुपयांचे शूज कलेक्शन असल्याचे बोलले जाते. बादशाहकडे 'रोल्स रॉयस व्रेथ' (Rolls-Royce Wraith) ही ६.४ कोटींची गाडी आहे.

याशिवाय लॅम्बोर्गिनी, पोर्श आणि मर्सिडीज बेंझ अशा गाड्या त्याच्या ताफ्यात आहेत. सध्या त्याच्याकडे मुंबईत १५ कोटींचे घर आणि चंदीगडमध्ये फार्महाऊस आहे.

सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार संपत्तीच्या शर्यतीत हनी सिंग हा बादशाहपेक्षा पुढे असल्याचे स्पष्ट होते. बादशाहचे नाव बादशाह असले तरी संपत्तीच्या बाबतीत मात्र हनी सिंग खरा किंग ठरला आहे.