Horoscope Today : 3 राशींचे नशीब चांगलेच फळफळणार, आयुष्यात मोठा धनलाभ; वाचा काय काय होणार?

एकूण 3 राशींसाठी 18 मार्च हा दिवस खूपच चांगला असणार आहे. या राशींच्या नशिबात मोठा धनलाभ आहे. परंतु या यातील एका राशीने पैसे खर्च करताना काही काळजी घेणेदेखील तेवढेच गरजेचे आहे.

| Updated on: Mar 17, 2026 | 9:47 PM
1 / 5
एकूण 3 राशींसाठी 18 मार्च हा दिवस खूपच चांगला असणार आहे. या राशींच्या नशिबात मोठा धनलाभ आहे. परंतु या यातील एका राशीने पैसे खर्च करताना काही काळजी घेणेदेखील तेवढेच गरजेचे आहे. या नशीबवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

एकूण 3 राशींसाठी 18 मार्च हा दिवस खूपच चांगला असणार आहे. या राशींच्या नशिबात मोठा धनलाभ आहे. परंतु या यातील एका राशीने पैसे खर्च करताना काही काळजी घेणेदेखील तेवढेच गरजेचे आहे. या नशीबवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

2 / 5

वृषभ राशीच्या लोकांनी 18 मार्च रोजी आपल्या जोडीदाराशी भांडण करणे टाळावे. वेळ सत्कारणी कसा लागेल, याकडे लक्ष द्यावे. अनपेक्षितपणे मोठा आर्थिक फायदा होईल. तसेच तुमचा मित्र तुम्ही दिलेले पसै परत करेल. व्यवसायातही एखादी मोठी डील होण्याची शक्यता आहे.

3 / 5

कन्या राशीच्या नशिबातही मोठा धनलाभ आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. तसेच अडकून पडलेले पैसे परत मिळतील. न्यायालयाच्या लढाईत विजय होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच प्रवासात सर्व नियमांचे पालन करा.

4 / 5

वृश्चिक राशीच्या नशिबात 18 मार्च रोजी मोठा धनलाभ आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. अपघात होऊ शकतो. त्यामुळे वाहने सावकाश चालवा. सर्व नियम पाळावेत. व्यवसायात नवी गुंतवणूक करताना काळजी घ्या. तुमच्या जवळचीच व्यक्ती तुम्हाला दगा देऊ शकते. त्यामुळे योग्य काळजी घ्या. घरात कोणतेही कारण नसताना भांडण होऊ शकते. शांत राहण्याचा प्रयत्न करा.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us