GK : भारतात दारू कशी आली, मुघल आणि ब्रिटिशांची काय भूमिका होती? जाणून घ्या…

भारतात फार वर्षांपासून मद्यप्राशन केले जाते. मुघल आणि ब्रिटिशांनी मद्यनिर्मितीचा विस्तार केला. मुघलांच्या काळात मद्यप्राशन हा प्रतिष्ठेचा विषय होता.

| Updated on: Jan 07, 2026 | 7:07 PM
1 / 5
आजघडीला देशात हजारो-लाखो लोक मद्यप्राशन करतात. विशेष म्हणजे अनेक लोक वेगवेगळ्या ब्रँडच्या मद्यांचे आवडीने प्राशन करतात. परंतु भारतात मद्य कधी आले? असे नेहमी विचारले जाते. त्यामुळेच ब्रिटिश आणि मुघलांच्या काळात मद्य आणि मद्यप्राशनसंबंधी काय नियम होते? हे जाणून घेऊ या...

2 / 5
भारतात मद्य सर्वात अगोदर मुघल किंवा ब्रिटिशांनी आणले नाही. भारतीय संस्कृतीत मद्याचे फार पूर्वीपासूनचे संदर्भ सापडतात. ऋग्वेदात मदिरेच्या वेगवेगळ्या प्रकारात उल्लेख केलेला आहे. भारतात फार पूर्वीपासून लोक मद्यप्राशन करतात. मुघल आणि इंग्रजांच्या काळात मद्यप्राशनाची पद्धत बदलली. तसेच नवनव्या मद्यांची निर्मिती झाली.

3 / 5
मुघलांच्या सत्तेत मद्याला शाही दरबारात विशेष स्थान होते. मुघलांच्या काळात मद्यप्राशन करणे हे सामाजिक स्थिती आणि शाही जीवनशैलीचा एक भाग होते. मुघल शासक अकबर मद्याप्राशन करत नव्हता. परंतु त्याच्या दरबारात मद्यप्राशन केले जायचे.

4 / 5
जहांगीर हा मुघल सम्राट मद्यशौकीन होता. त्याने त्याच्या शासनकाळात मद्याच्या व्यापाराला प्रोत्साहन दिले. इंग्रजांच्या काळात मात्र मद्यप्रशान फक्त शाही थाट किंवा सामाजिक स्थानाचेच प्रतिक राहिले नाही. ब्रिटिशांनी मद्याला व्यापाराचे रुप दिले. ब्रिटिशांच्या काळात मद्यविक्रीचा व्यवसाय वाढला. मद्यनिर्मिती आणि विक्री हे व्यापाराचे साधन बनले.

5 / 5
(मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशनाला प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश नाही. वरील लेखातील माहिती ही प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. अधिक माहितीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.)