
आपण आकाशाकडे पाहीलं की ढगांचा लपंडाव पाहायला मिळतो. कधी ढगांचं अच्छादन असतं तर क्षणार्धात निरभ्र आकाश.. उन्हाळ्यात काळे ढग जमा झाले तर उन्हापासून थोडा दिलासा मिळतो. पण क्षणार्धात काही ढग पुढच्या मार्गाला लागतात. असं कसं होतं ते जाणून घ्या. फोटो: Pixabay

सर्वप्रथम असा प्रश्न पडतो की ढग तयार होतात तरी कसे? सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचं बाष्पीभवन होतं. वाफ वर गेल्यानंतर घनरूप होते आणि त्याचे रुपांतर पाणी आणि बर्फाच्या कणांमध्ये होते. हे सर्व ढगात जमा होते. फोटो: Pixabay

ढग कधीच एकाच ठिकाणी का राहत नाहीत, ते त्यांची जागा का बदलत राहतात. याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे वाऱ्याची दिशा आणि वेग. जर वाऱ्याचा वेग वेगवान असेल तर त्याचा परिणाम ढगांवर दिसून येतो. जोरदार वारा ढगांना त्यांच्या जागेवरून हलण्यास भाग पाडतो. दुसरीकडे, मंद वाऱ्यात ढग जास्त काळ राहतात. फोटो: Pixabay

ढगांच्या स्थितीत बदल होण्यास आर्द्रता देखील जबाबदार असते. कारण ढगांमध्ये पाण्याचे कण असतात. त्यामुळे जास्त आर्द्रता असलेले ढग जास्त काळ आकाशात राहतात. जेव्हा जोरदार वारे वाहतात तेव्हा कमी आर्द्रता असलेले ढग त्यांची जागा सोडून वाऱ्याच्या दिशेने फिरत राहतात. फोटो: Pixabay

ढगांच्या स्थितीत तापमान देखील महत्त्वाची भूमिका बजावते. जर तापमान कमी असेल तर ढग जास्त काळ राहतात. याशिवाय कमी दाबाची प्रणाली ढगांना नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उच्च दाबाची प्रणाली तयार होताच, ढग त्यांचे स्थान सोडतात. फोटो: Pixabay