
उकडलेली अंडी योग्य प्रकारे ठेवली तर ती काही दिवस सुरक्षित रहातात.

कवच न काढलेली उकडलेली अंडी फ्रिजमध्ये ठेवली तर सुमारे ७ दिवस खाण्यालायक रहातात.

अंड्याचे कवच अंड्याला बॅक्टेरियापासून रक्षण करते म्हणून ती जास्त दिवस टिकतात.

कवच काढलेली उकडलेली अंडी फ्रिजमध्ये २ ते ३ दिवस सुरक्षित रहातात.यांना फ्रिजमध्ये नेहमी झाकणवाल्या डब्यात ठेवणे योग्य असते.

उकडलेली अंडी रुम टेम्परेचरला ६ ते ७ तासांहून जास्त काळ सुरक्षित रहात नाहीत.ती लवकरच खराब होण्याची शक्यता असते.

अंड्यातून तीव्र दुर्गधी येत असेल आणि रंग बदललेला दिसत असेल तर खाऊ नयेत.

चिकट पृष्टभाग देखील अंडी खराब झाल्याचा संकेत असतो. अशी अंडी खाऊ नयेत.

उकडलेल्या अंड्यांना नेहमीच फ्रिजमध्ये ठेवावे, वारंवार बाहेर काढू नयेत

अंडी उकडून बराच वेळ झाला असेल तर हलका वास घेऊन खात्री करावी आणि खावीत.