
अनेकांसाठी कॉफी म्हणजे फक्त पेय नसून तो एक एनर्जी डोस आहे. सकाळी उठल्याबरोबर वाफाळलेला कॉफीचा कप घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. कॉफीमधील कॅफिन आपल्याला इन्स्टंट एनर्जी देते. पण आज आपण दिवसातून किती कप कॉफी प्यावी आणि कधी प्यावी, याबद्दल जाणून घेणार आहोत.

मर्यादित प्रमाणात कॉफी पिणे शरीरासाठी औषधासारखे काम करते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे मेंदू सक्रिय होतो आणि सुस्ती दूर पळते. योग्य प्रमाणात कॉफी घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.

कॉफी यकृतातील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि फॅटी लिव्हरचा त्रास कमी करण्यास मदत करतात. कॉफी शरीरातील मेटाबॉलिझमचा वेग वाढतो, ज्यामुळे चरबी जाळण्यास मदत होते. संशोधनानुसार, ब्लॅक कॉफीमुळे टाईप २ मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एका दिवसात २ कप कॉफी पिणे सर्वात सुरक्षित आहे. एका सुदृढ माणसाने दिवसाला ४०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिन घेऊ नये. एका कपमध्ये साधारण १०० मिलीग्राम कॅफिन असते. त्यामुळे तुम्ही दिवसातून दोन ते तीन कपपर्यंत कॉफी पिऊ शकता.

जर तुम्ही दिवसातून ४-५ कपपेक्षा जास्त कॉफी पीत असाल, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कॉफीमुळे सतत हात-पाय थरथरणे किंवा चिडचिड होणे हे त्रास संभवतात. तसेच कॅफिनमुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो.

त्यासोबतच कॉफीमुळे रात्री वेळेवर झोप न येणे ही सर्वात मोठी समस्या असते. तसेच कॉफीमुळे पोटाचे विकार होतात. जास्त कॉफीमुळे पित्त वाढू शकते. सकाळी १० ते १२ च्या दरम्यान कॉफी पिणे सर्वात जास्त प्रभावी ठरते. पण दुपारी ४ वाजेनंतर कॉफी पिणे टाळावे.

कॉफीमधील कॅफिन तुमच्या शरीरात १२ तासांहून अधिक काळ राहू शकते. जर तुम्ही संध्याकाळी कॉफी प्यायली, तर तुमची रात्रीची झोप उडू शकते, ज्यामुळे पुढचा संपूर्ण दिवस थकवा जाणवू शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)