
तुम्हाला ठणठणीत आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर रोज व्यायाम करावा, असा सल्ला डॉक्टर हमखास देतात. आजघडीला लठ्ठपणाची समस्य तर फार वाढली आहे. अनेक लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी डॉक्टरांकडे चक्कर मारत असतात. व्यायाम करूनही काही लोकांचा लठ्ठपणा कमी होत नाही. पण चालण्याची सवय लठ्ठपणा कमी करण्यासाठी फार लाभदायी ठरू शकते.

अनेक हेल्थ एक्स्पर्ट्सना वाटते की रोज चालल्यावर लठ्ठपणा कमी होतो. काही तज्ज्ञांच्या मते तर धावण्यापेक्षा चालणे कधी-कधी फार फायद्याचे ठरू शकते. म्हणूनच काही लोक रोज दहा हजार ते पाच हजार पावले चालतात. काही लोक तीन किलोमीटर वॉकिंग करतात.

चालताना काही लोक वेगवेगळे ठोकताळे बांधत असतात. एक किलोमीटर चालले की अमूक अमूक पावले होतात, असे काही लोकांना वाटते. पण खरे पाहता एक किलोमीटर अंतर चालल्याने किती पवले होतात? याचा योग्य अंदाज फारच कमी लोकांना येतो. एक किलोमीटर म्हणजे साधारण 1,250 ते 1,550 पावले होतात.

एखादी ठणठणीत व्यक्ती एका किलोमीटरमध्ये साधारण 1400 पावले चालते असे, गृहित धरले जाते. एखाद्या व्यक्तीची उंची, त्या व्यक्तीची चालण्याची गती, पवलांमधील अंतर यावरून संबंधित व्यक्ती एका किलोमीटरमध्ये किती अंतर चालते, हे ठरते. चालणे आणि धावण्याची क्रिया करताना एका किलोमीटरमधील पवलांचे अंतर कमी-जास्त असते.

महिला आणि पुरुषाच्या पवलांमधील अंतर कमीजास्त असते. त्यामुळे महिला आणि पुरुष एका किलोमीटरमध्ये कमी-जास्त पावले चालतात. तुम्हाला तंतुरुस्त राहायचे असेल तर दिवसाला साधारण दहा हजार पावले चालले पाहिजे, असे सांगितले जाते. म्हणजे साधारण सात ते आठ किलोमीटर चालावे, असे म्हटले जाते. (टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांशी, डॉक्टरांशी संपर्क साधा. )