1 ते 100 मध्ये ‘9’ हा अंक किती वेळा येतो? 99% लोक देऊ शकत नाहीत योग्य उत्तर!

एक ते नऊपर्यंत मोजणी: १ ते ९ या संख्यांमध्ये फक्त ९ या संख्येतच हा अंक येतो. त्यामुळे या टप्प्यात ९ हा अंक एकदाच येतो.
दहा ते एकोणीसपर्यंत मोजणी: १० ते १९ या संख्यांमध्ये फक्त १९ या संख्येत ९ हा अंक आहे. त्यामुळे या टप्प्यातही ९ हा अंक एकदाच येतो.
वीस ते एकोणनव्वदपर्यंत मोजणी:२० ते २९ मध्ये २९, ३० ते ३९ मध्ये ३९, अशा प्रकारे प्रत्येक दहाच्या गटातील शेवटच्या संख्येत ९ येतो. त्यामुळे २० ते ८९ या संख्यांमध्ये ९ हा अंक एकूण ७ वेळा येतो.
नव्वद ते नव्याण्णवपर्यंत मोजणी: ९० ते ९९ या सर्व दहा संख्यांमध्ये दशकस्थानी ९ हा अंक आहे. मात्र, ९९ मध्ये दोन वेळा ९ येतो. त्यामुळे या गटात ९ हा अंक एकूण ११ वेळा येतो.
शंभरपर्यंतची अंतिम मोजणी: आता सर्व आकडे एकत्र केल्यास १ ते ९ मध्ये १ वेळा, १० ते १९ मध्ये १ वेळा, २० ते ८९ मध्ये ७ वेळा आणि ९० ते ९९ मध्ये ११ वेळा ९ येतो. १०० मध्ये ९ हा अंक नसल्यामुळे त्याची भर पडत नाही. म्हणजेच १ + १ + ७ + ११ = २०! १ ते १०० पर्यंतच्या मोजणीत ९ हा अंक एकूण २० वेळा येतो.