मार्गरीटा ते पेपरोनी, तुमच्या आवडत्या पिझ्झामध्ये नक्की किती फॅट्स असतात? पाहा धक्कादायक आकडेवारी

तुमच्या आवडत्या पिझ्झाच्या एका स्लाईसमध्ये नक्की किती फॅट्स आणि कॅलरीज असतात? चीज बर्स्ट आणि मार्गरीटा पिझ्झा आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतो, याबद्दल सविस्तर माहिती आणि तज्ज्ञांचा सल्ला येथे वाचा.

| Updated on: Apr 21, 2026 | 2:16 PM
1 / 6
फास्ट फूडच्या जगात पिझ्झा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ बनला आहे. पिझ्झा हा जगभरात लोकप्रिय असलेला खाद्यपदार्थ आहे. पण तुमच्या आवडत्या पिझ्झामध्ये नक्की किती फॅट्स असतात, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? नाही ना, आज आपण याबद्दल जाणून घेऊया.

फास्ट फूडच्या जगात पिझ्झा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ बनला आहे. पिझ्झा हा जगभरात लोकप्रिय असलेला खाद्यपदार्थ आहे. पण तुमच्या आवडत्या पिझ्झामध्ये नक्की किती फॅट्स असतात, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? नाही ना, आज आपण याबद्दल जाणून घेऊया.

2 / 6

पिझ्झाच्या एका स्लाईसमध्ये असणारे कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकते, असे पोषणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पिझ्झाची निवड करताना त्यातील टॉपिंग्स आणि क्रस्ट यानुसार चरबीचे प्रमाण ठरते.

3 / 6

जर तुम्ही साधा चीज आणि टोमॅटो असलेला मार्गरीटा पिझ्झा खात असाल, तर एका मध्यम स्लाईस मधून तुम्हाला साधारण १० ते १२ ग्रॅम चरबी मिळते. जर तुम्ही व्हेजी सुप्रीम हा पिझ्झा खात असाल तर त्यात भाज्यांचे प्रमाण जास्त असल्याने यात फायबर मिळते. मात्र चीजमुळे यातही ९ ते १३ ग्रॅम पर्यंत फॅट्स असतात.

4 / 6

पेपरोनी आणि प्रक्रिया केलेले मांस (Processed Meat) असलेल्या पिझ्झामध्ये चरबीचे प्रमाण सर्वाधिक असते. एका स्लाईसमध्ये १५ ते २२ ग्रॅम पर्यंत चरबी असू शकते, जी हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

5 / 6

आजकाल 'चीज बर्स्ट' किंवा 'चीज स्टफ्ड क्रस्ट' पिझ्झाची मोठी क्रेझ आहे. संशोधनानुसार, अशा पिझ्झाच्या केवळ एका स्लाईसमध्ये २५ ते ३० ग्रॅम चरबी असू शकते. आहारतज्ज्ञांच्या मते, एका सुदृढ व्यक्तीच्या दिवसाच्या एकूण गरजेच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे.

6 / 6

तज्ज्ञांच्या मते, पिझ्झा खाताना 'थिन क्रस्ट' (पातळ बेस) निवडावा आणि त्यावर चीजचे प्रमाण कमी करून भाज्यांचे प्रमाण वाढवावे. यामुळे चवही टिकते आणि शरीरात जाणारी अतिरिक्त चरबी मर्यादित राहण्यास मदत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us