
मागच्यावर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता.

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाला आता जवळपास एक वर्ष होत आलय. माजी टेनिस स्टार सानिया मिर्झाची कमाई ब्रांड एंडोर्समेंट, गुंतवणूक आणि टेनिस अकादमीमधून होते.

सानिया मिर्झा पब्लिक अपीरियंसमध्ये दिसते. टेलिविजय अपीरियन्समधूनही ती पैसा कमावते. सानिया मिर्झा एशियन पेंटस, लॅक्मे, डेन्यूब प्रॉपर्टीज आणि हर्षे सारख्या ब्रांड्सचा प्रचार करते.

सानिया मिर्झा कथितरित्या प्रत्येक ब्रांड एंडोर्समेंटमधून जवळपास 60 ते 70 लाख रुपये कमावते.

घटस्फोटाच्यावेळी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची एकूण संपत्ती 250 कोटींच्या घरात असल्याच बोललं जात होतं. आता वर्षभराने टेनिस स्टार सानिया मिर्झाची संपत्ती 216 कोटी झाल्याच बोललं जात आहे.