
कमाईचा नवा उच्चांक : भारतीय रस्ते पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे टोल वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये टोलमधून होणारी कमाई पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

कमाई वाढीची कारणे : वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, लॉजिस्टिक क्षेत्राचा विस्तार आणि टोल दरांमध्ये वेळोवेळी होणारी सुधारणा यामुळे ही कमाई वाढली आहे. 2025-26 या वर्षात ही कमाई सुमारे 75000 कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे.

फास्टॅगचा प्रभाव: देशातील 98% पेक्षा जास्त वाहने आता फास्टॅगचा वापर करत आहेत. यामुळे टोल वसुलीमध्ये पारदर्शकता आली असून वसुलीचा खर्चही कमी झाला आहे. 2024-2025 मध्ये फास्टॅगद्वारे 72390 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.

पैशांचा विनियोग: टोलमधून जमा होणारा पैसा मुख्यत्वे राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम, देखभाल-दुरुस्ती आणि नवीन एक्सप्रेसवे उभारण्यासाठी वापरला जातो. याशिवाय रस्ते सुरक्षा, वृक्षारोपण आणि महामार्गांवरील आधुनिक सुविधांसाठीही या निधीचा वापर होतो.

कडक नियम: टोल थकबाकी रोखण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. आता जुने वाहन विकताना किंवा फिटनेस सर्टिफिकेट घेताना प्रलंबित टोल टॅक्स भरणे अनिवार्य करण्यात आले आहे, जेणेकरून महसूल गळती थांबवता येईल.