
परकीय चलनाचे दर सतत बदलत असतात. खास करुन डॉलर आणि भारतीय, पाकिस्तानी रुपयांच्या विनिमय दराकडे लोकांचे लक्ष असते.

परंतू तुम्हाला माहिती आहे का एक लाख अमेरिकन डॉलर किती पाकिस्तानी रुपयांच्या बरोबर आहेत. चला तर पाहूयात...

जर 1 लाख अमेरिकन डॉलरचा विचार केला तर ,सध्या 1 डॉलर = 279.87 PKR च्या बरोबर आहे. त्यानुसार 1 लाख डॉलर = 1,00,000 x 279.87 PKR = 2,79,87,000 पाकिस्तानी रुपये होतील. म्हणजेच 1 लाख अमेरिकी डॉलर पाकिस्तानमध्ये सुमारे 2.79 कोटी पाकिस्तानी रुपयांच्या समान होतील.

डॉलर जगातील मजबूत आणि स्थिर चलनापैकी एक मानले जाते. तसेच पाकिस्तानी रुपयांची किंमत डॉलरच्या तुलनेत सारखी कमी जास्त होत असते. आर्थिक स्थिती, राजकीय अस्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याचा विनिमय दरावार परिणाम होतो.

जर पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत असेल तर पाकिस्तानी रुपयाचे मूल्य स्थिर राहते.मात्र, कमकुवत आर्थिक निर्देशकांमुळे रुपया घसरू शकतो. उच्च चलनवाढ किंवा व्याजदरातील बदल डॉलर आणि रुपयांमध्ये अंतर तयार करतात.एक डॉलरची किंमत सध्या 280.20 पाकिस्तानी रुपये एवढी आहे.