
तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप सतत चालू असेल तर तो हळूहळू स्लो होऊ शकतो. तसेच त्यातील अॅप्स क्रॅश होऊ लागतात, लॅगच्या समस्या उद्भवतात आणि कधीकधी सुरक्षा धोके देखील वाढतात.

वरील समस्यांमुळे तज्ज्ञ तुमचा फोन आणि लॅपटॉप रीस्टार्ट करण्याचा सल्ला देतात. रीस्टार्ट करणे म्हणजे तुमच्या डिव्हाइससाठी दीर्घ श्वास घेण्यासारखे आहे. यामुळे फोन आणि लॅपटॉप पुन्हा सुरळीतपणे कार्य करतात.

जेव्हा तुमचा फोन किंवा लॅपटॉप बराच काळ चालू राहतो तेव्हा त्यात अनेक तात्पुरत्या फाइल्स रॅममध्ये जमा होतात. तसेच या काळात अनेक अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे सिस्टमवर अधिक ताण येतो.

आठवड्यातून किमान एकदा फोन रिस्टार्ट करणे आवश्यक आहे. कारण फोन सतत चालू राहिल्यामुळे बॅकग्राउंडमध्ये अनेक ॲप्स आणि कॅशे मेमरी साठत राहते. रिस्टार्ट केल्यामुळे रॅम रिकामी होते आणि किरकोळ सॉफ्टवेअर बग्स निघून जातात आणि फोनचा वेग वाढतो.

आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा लॅपटॉप पूर्णपणे रिस्टार्ट किंवा शटडाउन करावा. कारण बहुतेक लोक लॅपटॉप वापरून झाल्यावर फक्त त्याची स्क्रीन बंद करतात. स्लीप मोडमध्ये लॅपटॉप पूर्णपणे बंद होत नाही. रिस्टार्ट केल्यामुळे सिस्टममधील अपडेट्स इन्स्टॉल होतात आणि मेमरी लिक्स थांबतात.