भांडी घासण्याचा स्क्रबर किती दिवस वापरावा? 21 दिवसांचा नियम काय सांगतो?

स्वयंपाकघरातील भांडी घासण्याचा स्क्रबर किती दिवसांनी बदलावा? ओल्या स्क्रबरमध्ये दडलेले बॅक्टेरिया तुमच्या आरोग्याला कसे धोका पोहोचवू शकतात आणि ते स्वच्छ ठेवण्याच्या योग्य पद्धती काय आहेत, जाणून घ्या.

| Updated on: Feb 03, 2026 | 3:40 PM
1 / 8
गृहिणी असो वा बॅचलर, आपण सगळेच स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबत जागरूक असतो. मात्र, भांडी लख्ख करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रबरकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.

गृहिणी असो वा बॅचलर, आपण सगळेच स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबत जागरूक असतो. मात्र, भांडी लख्ख करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रबरकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.

2 / 8

एका जागतिक आरोग्य अहवालानुसार, स्वयंपाकघरातील ओला स्क्रबर किंवा स्पंजमध्ये मोठ्या प्रमामात बॅक्टेरिया आढळू शकतात. त्यामुळे तो किती दिवस वापरावा, याबाबत काही ठोस नियम तज्ज्ञांनी सांगितले आहेत.

3 / 8

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भांडी घासण्याचा स्क्रबर जास्तीत जास्त २ ते ३ आठवड्यांपेक्षा (१४ ते २१ दिवस) जास्त काळ वापरू नये. तो दिसायला नवीन वाटत असला, तरी त्यातील छिद्रांमध्ये अन्नाचे कण आणि ओलावा साचून राहतो.

4 / 8

यामुळे साल्मोनेला आणि ई-कोलाय सारख्या घातक बॅक्टेरियांची निर्मिती होते, ज्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. धुवूनही जर स्क्रबरचा वास येत असेल, तर समजून जा की त्यात बॅक्टेरियांचे प्रमाण वाढले आहे.

5 / 8

स्क्रबरचा आकार बदलणे किंवा त्याचे धागे निघाले असतील तर तो निकामी झाला आहे, हे समजून घ्या. जर भांडी घासण्याची घासणी हाताला तेलकट किंवा चिकट लागत असेल, तर ती पूर्णपणे अस्वच्छ झाली आहे. त्यामुळे ती लगेचच बदलावी.

6 / 8

भांडी घासून झाल्यानंतर स्क्रबरमधील पाणी पूर्णपणे पिळून काढा आणि तो हवेशीर जागी ठेवा. तसेच दिवसातून एकदा स्क्रबर कडक गरम पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवा. यामुळे जंतू मरण्यास मदत होते.

7 / 8

तसेच दूध किंवा मांसाहारी पदार्थांची भांडी घासण्यासाठी वेगळा स्क्रबर वापरणे अधिक सुरक्षित ठरते. किचनमधील छोटीशी दिसणारा हा स्क्रबर मोठ्या आजारांना निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे दर १५-२० दिवसांनी नवा स्क्रबर वापरण्याची सवय लावून घ्या.

8 / 8

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us