Banking Update : बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बदलायचा आहे? बँकेत जाण्याची गरज नाही; घरबसल्या असं करा अपडेट
बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बदलण्यासाठी प्रत्येक वेळी शाखेत जाण्याची गरज नसते. नेट बँकिंग किंवा बँकेच्या अधिकृत अॅपमध्ये उपलब्ध पर्यायांद्वारे अपडेटची हा नंबर तुम्हाला बदलता येऊ शकतो.

नवीन सिम कार्ड घेतलंय किंवा जुना मोबाईल नंबर बंद झालाय? मग बँक खात्याशी जोडलेल्या नंबरही बदलणं गरजेचं आहे. कारण खात्यातून पैसे जमा किंवा काढल्याचे मेसेज, अनेक व्यवहारांसाठी ओटीपी याच नंबरवर येतात. पण मग हा नंबर बदलण्यासाठी बँकेत रांगेत उभ राहण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल अॅपच्या मदतीने नंबर बदलू शकता.
नेट बँकिंद्वारे मोबाईल नंबर कसा बदलायचा : 1. सगळ्यात आधी बँकेच्या अधिकृत बँकिंग वेबसाईवर जा. 2. तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
3. प्रोफाईल, पर्सनल डिटेल्स किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स हा पर्याय शोधा. 4. त्यामध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्यय उपलब्ध असल्यास तो निवडा.
5. त्यामध्ये नवीन नंबर टाकून आवश्यक पडताळणी पूर्ण करा. 6. बँकेने दिलेल्या सूचनेनुसार विनंती सबमिट करा
बँकेच्या अॅप्सवरूनही बदलता येतो नंबर : काही बँका त्यांच्या अधिकृत अॅप्सवरूनच नंबर बदलण्याचा पर्याय देतात. यासाठी अॅपमध्ये लॉगिन करून प्रोफाईल किंवा संपर्क तरशीलांचा पर्याय तपासा.त्यानंतर नवीन नंबर टाकून पडताळणी पूर्ण करा
ATM मधूनही करता येतो नंबर : काही बँका ATM मधून नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलण्याची मुभा देतात. यासाठी बँकेच्या ATM मध्ये डेबिट कार्ड वापरून लॉगिन करावं लागतं. त्यानंतर सर्व्हिसेस किंवा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन सारखा पर्याय उपलब्ध असतो.