गृहिणींनो लक्ष द्या, गॅस सिलेंडर स्वत: देतो संपण्याचे संकेत, काय आहे ट्रिक?

सिलेंडरमधील गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्यासाठी आता कोणत्याही मशीनची गरज नाही. गॅसची पातळी ओळखण्याच्या सोप्या पद्धती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

| Updated on: Mar 03, 2026 | 3:15 PM
1 / 8
आजच्या धावपळीच्या जीवनात एलपीजी गॅस सिलेंडर हा प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनला आहे. पण ऐन गडबडीच्या वेळी किंवा पाहुणे आले असताना अचानक गॅस संपला की मोठी पंचायत होते.

2 / 8
अनेकदा सिलेंडरमध्ये नक्की किती गॅस शिल्लक आहे, याचा अंदाज येत नाही. पण काळजी करू नका, आज आपण कोणत्याही मशीनशिवाय घरच्या घरी काही सोप्या ट्रिक्स वापरून गॅसची किती शिल्लक आहे, याची पातळी तपासणार आहोत.

3 / 8
सिलेंडरमधील गॅस मोजण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. एक कापड पाण्यात भिजवून ओले करा आणि ते सिलेंडरच्या बाजूने वरपासून खालपर्यंत गुंडाळा. एक-दोन मिनिटांनंतर कापड काढून टाका.

4 / 8
सिलेंडरचा जो भाग रिकामा आहे, तिथले पाणी पटकन सुकेल. मात्र, ज्या भागात गॅस भरलेला आहे, तो भाग थंड राहिल्यामुळे तिथला ओलावा सुकायला वेळ लागेल. हा ओलावा जेवढ्या भागात आहे, तेवढा गॅस शिल्लक आहे असे समजावे.

5 / 8
प्रत्येक सिलेंडरवर त्याचे रिकामे वजन लिहिलेले असते. त्यासाठी प्रथम पूर्ण सिलेंडरचे वजन करा. त्यातून सिलेंडरवर लिहिलेले टायर वेट वजा करा. उरलेली संख्या म्हणजे तुमच्या सिलेंडरमधील गॅसचे निव्वळ वजन असते. साधारणपणे घरगुती सिलेंडरमध्ये १४.२ किलो गॅस असतो. त्यावरून तुम्ही वापराचा अंदाज घेऊ शकता.

6 / 8
कधीकधी सिलेंडर स्वत:च गॅस संपत आल्याची पूर्वसूचना देतो. जर गॅसची ज्योत नेहमीसारखी निळी आणि प्रखर दिसत नसेल, तर समजावे की गॅस संपत आला आहे.

7 / 8
स्वयंपाक व्हायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असेल किंवा गॅसची ज्योत पिवळी आणि हळूहळू होत असेल तर हे गॅस संपत आल्याचे लक्षण आहे, अशी चिन्हे दिसताच वेळीच नवीन सिलेंडर बुक करणे शहाणपणाचे ठरेल.

8 / 8
याव्यतिरिक्त, जेव्हा सिलेंडर भरलेला असतो, तेव्हा तो हलवला तरी आतून कोणताही आवाज येत नाही किंवा हालचाल जाणवत नाही. मात्र, गॅस कमी झाल्यावर सिलेंडर हलवल्यास आतमध्ये द्रव पदार्थ (Liquid) हलल्याचा स्पष्ट आवाज येतो. यावरूनही गॅस किती शिल्लक आहे याचा ढोबळमानाने अंदाज लावू शकता.

Follow Us