कांदा खरेदी करताना या चुका टाळा; अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान
कांदे खरेदी करताना ग्राहकांनी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही कांदे खरेदी करताना चूक केल्यास तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकते.
1 / 5

अनेक महिला,पुरुष बाजारात कांदा खेरदी करताना दिसतात. परंतु कांदा खरेदी करता काही चुका केल्यास पैशांचं नुकसान होण्याची शक्यता असते.
2 / 5
ओलसर आणि हिरवे कांदे खरेदी करणे टाळावे. ओलसर कांदे लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
3 / 5
हिरवे कोंब असलेले कांदे खरेदी करू नये. कारण या कांद्यातील ओलावा आणि पोषक तत्वे नाहीशी होतात. तसेच या कांद्याला एक उग्र वास देखील येतो.
4 / 5
दुकानांत प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवलेले कांद्यांमध्ये ओलावा निर्माण होतो. उन्हात, हवेशीर ठिकाणी साठवलेले कांदे जास्त काळ टिकतात.
5 / 5
कांदे आणि बटाटे एकत्र ठेवणे टाळले पाहिजे. बटाट्यातून बाहेर पडणाऱ्या एका वायूमुळे कांद्यांना कोंब फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे एकत्र ठेवण्यात आलेले कांदे सडण्याची शक्यता अधिक असते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us