
स्ट्रेसफुल लाईफस्टाईलमुळे तणाव आणि डिप्रेशनचा त्रास सुरू होतो. दिवसभर ऑफिसचे काम आणि घरातील जबाबदारी यामुळे अनेकांच्या मनात सतत चिंता असते. त्यामुळेही स्ट्रेस आणि डिप्रेशन येते. यामुळे मानसिक शांती नाहीसी होते. परंतु काही व्यायाम करून तुम्ही स्ट्रेसपासून आराम मिळवू शकता.

तणाव आणि स्ट्रेसपासून दूर राहायचे असेल तरी ध्यान हा चांगला उपाय ठरतो. मेडिटेशन हा व्यायाम आणि योगासने याचाच एक भाग मानला जातो. त्यामुळेच मेडिटेशन हे मानसिक शांती मिळवण्यासाठी चांगला पर्याय असल्याचे मानले जाते.

मेडिटेशन केल्याने शरीरात नवी उर्जा निर्माण होते. उत्स्फूर्तता येते. अनेकांना मेडिटेशन सुरू करायचे असते. पण ते कसे करावे हेच समजत नाही. त्यामुळे मेडिटेशन कसे सुरू करावे. त्यासाठीची सोपी पद्धत कोणती हे समजून घेऊ या...

मेडिटेशन करण्याआधी तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. त्यानंतर दीर्घ श्वास घेतल्यानेही तुमचा बराचसा स्ट्रेस नाहीसा होता. शांतपणे बसून दीर्घ श्वास घ्या आणि ध्यान चालू करा. मेडिटेशन करताना आजूबाजूला शांत वातावरण असणे गरजेचे आहे.

ध्यान करण्यासाठी कोणतीही एक वेळ ठरवा. त्यानंतर कोणताही स्ट्रेस न घेता शांतपणे ध्यान करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला तुम्हाला फार अडथळे येतील. परंतु सराव केल्यानंतर ध्या करणए सोपे होईल. हळूहळू ध्यान करण्याची वेळही वाढवता येते. (ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)