D Mart : डी मार्ट मध्ये जॉब करायचा असेल तर शिक्षण किती हवं ? वाचा सविस्तर

डी-मार्ट (D-Mart) हे एक लोकप्रिय शॉपिंग मार्ट असून देशभरात त्याचे स्टोअर्स वाढत आहेत, ज्यामुळे नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. डी-मार्टमधील नोकरीसाठी पात्रता आणि पगार जाणून घ्या.

| Updated on: May 02, 2026 | 8:15 AM
1 / 6
आजकाल बरेच लोक डी-मार्टमध्ये खरेदी करण्यास प्राधान्य देतात, कारण तिथे लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या वस्तू, एकाच ठिकाणी परवडणाऱ्या किमतीत मिळतात. यामुळे डी-मार्ट एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह ब्रँड बनला आहे. ( All Photos : Social Media)

2 / 6
D-Mart हे एक असं शॉपिंग मार्ट आहे, जिथे आपल्याला आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू खूप कमी किमतीत मिळतात. याची सुरुवात राधाकृष्णन दमानी यांनी 2002 साली केली. लोकांना एकाच ठिकाणी कमी किमतीत चांगल्या वस्तू मिळाव्यात, हा या व्यवसायाचा उद्देश होता. पहिले दुकान मुंबईतील पवई परिसरात उघडण्यात आले. पण आज डी-मार्ट देशभरात पसरले असून, 184 पेक्षा जास्त दुकाने उघडण्यात आली आहेत, जिथे तुम्ही आरामात खरेदी करू शकता.

3 / 6
एकदा तुम्ही D-Martला भेट दिली की, तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही दुकानात जाण्याची गरज भासणार नाही. तुमच्या दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू तुम्हाला येथे मिळतील. याच कारणामुळे आज डी-मार्ट एक अत्यंत यशस्वी व्यवसाय बनला आहे.

4 / 6
सध्या मोठ्या प्रमाणात डी-मार्टची स्टोअर्स उघडताना दिसत असून त्यामुळे आता तिथे नोकरीची देखील मोठी संधी आहे.  डी-मार्टमध्ये नोकरी मिळवण्यासाठी, तुमच्याकडे किमान 10वी पदवी असणे आवश्यक आहे. जर तुमचे शिक्षण दहावीपेक्षा कमी असेल, तर डी-मार्टमध्ये नोकरी मिळवणे थोडं कठीण होऊ शकते. मात्र, जर तुम्ही पदवीधर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल, तर तुम्हाला येथे एक चांगली, उच्च पदाची नोकरी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

5 / 6
डी-मार्टमध्ये तुम्हाला तुमच्या क्वॉलिफिकेशनप्रमाणे जॉब आणि पोस्ट मिळते. म्हणजे तुमचं शिक्षण जेवढं उत्तम, तेवढी चांगली संधी तुम्हाला मिळू शकते. डी-मार्टमधील पगार दरमहा अंदाजे 20 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत असू शकतो. हा पगार तुमचं पद आणि अनुभव या दोन्हींवर अवलंबून असतो.

6 / 6
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

Follow Us