तुमच्याही घरात विषारी साप लपला आहे का? ‘हे’ 6 संकेत मिळताच व्हा सावध!
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरांमध्ये साप शिरण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. पण घरात जर साप शिरला असेल तर कसे ओळखायचे? जाणून घ्या 6 गोष्टी.

उन्हाळ्याच्या दिवसांत घरात साप शिरण्याच्या घटना वाढतात आणि हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अलीकडे केरळमध्ये साप चावल्याने एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने सतर्कता अधिक महत्त्वाची ठरली आहे.

तज्ञांच्या मते, घरात किंवा तुमच्या घराजवळ असणाऱ्या बागेत साप असल्याची काही स्पष्ट चिन्हे ओळखता येतात. ते कशी जाणून घ्या सविस्तर

सापाची साल सापडणे हा त्याच्या उपस्थितीचा ठोस पुरावा मानला जातो. तसेच जमिनीवर ‘S’ आकाराचे रेंगण्याचे निशाण दिसणे, घरात कस्तुरीसारखा विचित्र वास येणे हीही महत्त्वाची लक्षणे आहेत.

पाळीव कुत्रे किंवा मांजरे अचानक एखाद्या कोपऱ्याकडे भुंकू लागले किंवा विचित्र वागू लागले तर तेही धोका दर्शवू शकते.

याशिवाय, घरातील उंदीर अचानक गायब होणे किंवा रात्री भिंतींमागून सळसळणारे आवाज येणे ही सापाच्या उपस्थितीची शक्यता दर्शवणारी संकेत आहेत. त्यामुळे अशी कोणतीही चिन्हे दिसल्यास दुर्लक्ष न करता त्वरित काळजी घेणे आवश्यक आहे.