Milk Storage Tips: फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही दूध का फाटतं? ‘ही’ चूक पुन्हा करुच नका

Milk Storage Tips: प्रत्येक जण दूध उकळ्यानंतर फ्रिजमध्ये ठेवतात, पण अनेकांची एकच समस्या असते आणि ती म्हणजे, दूध फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर देखील फाटतं... थंड वातावरणातही दूध खराब होण्यामागे आपल्या काही चुका कारणीभूत असतात. तर कोणती चूक करु नये जाणून घ्या...

| Updated on: Nov 22, 2026 | 3:23 PM
1 / 5
दूध खराब होऊ नये म्हणून आपण ते सहसा फ्रिजमध्ये ठेवतो. पण फ्रिजमध्ये ठेवल्यावरही दूध फाटलेलं किंवा आंबट झालेलं आपल्याला अनेकदा दिसतें. थंड वातावरणातही दूध खराब होण्यामागे काही सामान्य चुका असतात.

दूध खराब होऊ नये म्हणून आपण ते सहसा फ्रिजमध्ये ठेवतो. पण फ्रिजमध्ये ठेवल्यावरही दूध फाटलेलं किंवा आंबट झालेलं आपल्याला अनेकदा दिसतें. थंड वातावरणातही दूध खराब होण्यामागे काही सामान्य चुका असतात.

2 / 5

बरेच लोक रेफ्रिजरेटरच्या दाराजवळील कप्प्यात दूध ठेवतात. जेव्हा दार वारंवार उघडले आणि बंद केले जाते, तेव्हा तेथील तापमानात बदल होतो. यामुळे दुधातील जिवाणूंची वाढ वेगाने होऊ शकतं आणि दूध लवकर खराब होऊ शकतं. दूध रेफ्रिजरेटरमधील थंड राहणाऱ्या कप्प्यात ठेवणं अधिक चांगलं आहे.

3 / 5

उकळल्यानंतर गरम दूध फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजमधील तापमान वाढू शकतं. शिवाय, भांड्यामध्ये ओलावा जमा होऊ शकतो, ज्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. दूध खोलीच्या तापमानापर्यंत थंड झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवा.

4 / 5

त्याचप्रमाणे, दूध फ्रिजमध्ये उघडं ठेवल्यास, ते इतर पदार्थांचा वास शोषून घेण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरील सूक्ष्मजंतूंना आत प्रवेश करणेही सोपं होऊ शकते. दूध नेहमी स्वच्छ, हवाबंद डब्यात ठेवा.

5 / 5

फ्रिजमध्ये ठेवलेल्या शिळ्या दुधात ताजे विकत घेतलेलं किंवा उकळलेलं दूध ओतू नका. शिळ्या दुधात आधीपासूनच सूक्ष्मजंतू असू शकतात. ते नवीन दुधात वेगाने पसरू शकतात, ज्यामुळे दूध लवकर खराब होऊ शकतं

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us