आरोग्यास अत्यंत लाभदायक असलेली मोरिंग्याची भाजी कशी करतात? जाणून घ्या रेसिपी

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो... ज्यामुळे काही अशा भाज्या आहेत, ज्या तुमच्या आरोग्याला फायदेशीर ठरतील. अशीत एक भाजी म्हणजे मोरिंगा... मोरिंगा (शेवग्याची पाने) भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तर जाणून घ्या भाजी कशी बनवतात..

| Updated on: Dec 17, 2025 | 3:55 PM
1 / 5
मोरिंग्याची भाजी बनवण्याचं साहित्य शेवग्याची कोवळी पाने – 2 वाट्या, कांदा – 1 बारीक चिरलेला, लसूण – 4 - 5 पाकळ्या, हिरवी मिरची – 1 - 2, मोहरी – ½ टीस्पून, जिरे – ½ टीस्पून, हळद – ¼ टीस्पून, लाल तिखट – चवीनुसार, मीठ – चवीनुसार, तेल – 1 टेबलस्पून

2 / 5
भाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार,  किसलेले ओले खोबरे / शेंगदाण्याचा कूट – 1 - 2 टेबलस्पून, थोडासा गूळ देखील घालू शकता... भाजी बनवताना सर्वात आधी शेवग्याची पाने नीट निवडून धुवा आणि पाणी निथळू द्या. त्यानंतर कढईत तेल गरम करा. मोहरी घाला, ती तडतडली की जिरे घाला.

3 / 5
लसूण व हिरवी मिरची घालून थोडे परता. कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. हळद, लाल तिखट घालून लगेच शेवग्याची पाने टाका. मीठ घालून झाकण ठेवून मंद आचेवर 5 - 7 मिनिटे शिजवा. सर्वात  महत्त्वाचं म्हणजे भाजीत पाणी  घालू नका... पानांतूनच पाणी सुटेल

4 / 5
भाजी शिजल्यावर खोबरे/शेंगदाण्याचा कूट आणि चिमूटभर गूळ घालून हलके ढवळा. त्यानंतर 1 मिनिट परतून गॅस बंद करा. भाजी जास्त शिजवू नका; नाहीतर कडू लागू शकते. ही भाजी भाकरी, ज्वारी/बाजरीची भाकरी किंवा पोळीबरोबर छान लागते.

5 / 5
मोरिंग्याची भाजी खूप जास्त प्रमाणात रोज खाऊ नका. गर्भवती महिलांनी नियमित सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नेहमी ताजी व नीट शिजवलेली भाजी खावी