
आपण अनेकदा भांडी धुण्यासाठी बाजारातून साबण घेऊ येतो. अशा साबणांचा वापर केल्यावर भांडी तर मस्त चमकतात परंतु महिलांचे हात मात्र कोरडे होतात. हात खराब होतात. त्यामुळेच हात खराब होणार नाहीत यासाठी तुम्ही घरीच एक साबण तयार करू शकता.

हा साबण कसा तयार करता येईल ते जाणून घेऊ या. घरी तयार केलेल्या या साबणामुळे तुमचे हात कोरडे पडणार नाहीत. ते खराब होणार नाही. सोबतच तुमची भांडीदेखील खूप चांगल्या पद्धतीने साफ होतील.

भांडी धुण्यासाठी वापरावयाचा साबण घरीच तयार करायचा असेल तर तुमच्याकडे, एक साबण, व्हिनेगर, मीठ, ग्लिसरीन, लिंबू, लव्हेंडर,पेपरमिंट असणे गरजेचे आहे. घरच्या घरीच साबण तयार करायचा असेल तर साबणाचे काही तुकडे करा. साबणाचे बारिक तुकडे केले तरी चालतील. साबणाचा तुकडा आणि पाणी यांना मंद आचेवर उकळायला टाका. पाणी न उकळू देता उकळणे चालूच ठेवा. त्यानंतर या मिश्रणात व्हिनेगर टाका टाका.

ग्लिसरीन टाकल्याने हे मिश्रण घट्ट होईल त्यामुळे ग्लिसरीनही टाका. तुमच्या आवडीनुसार या मिश्रणात लिंबाचे थेंब, लॅव्हेंडर टाकता येईल. यामुळे साबणाला सुगंध येईल. हे पूर्ण मिश्रण एका सोपच्या कंटेनरमध्ये टाका. त्यानंतर भांडी धुताना हे मिश्रण एक ते दोन चम्मच घ्यावे आणि वापरावे.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)