होळी खेळण्यापूर्वी फक्त करा छोटंसं काम, एका मिनिटात रंग होईल छुमंतर

होळीचा पक्का रासायनिक रंग त्वचेवरून आणि केसांतून सहज आणि सुरक्षितपणे काढण्यासाठी खास घरगुती उपाय जाणून घ्या.

| Updated on: Feb 27, 2026 | 3:27 PM
1 / 10
होळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि रंगांची उधळण. पण या रंगांच्या धुंदीत अनेकदा पक्के रासायनिक रंग त्वचेवर आणि केसांवर जमा होतात. मग हे रंग काढणं एक मोठं आव्हान होऊन बसते.

2 / 10
त्वचेवर लागलेले हे रंग चुकीच्या पद्धतीने काढल्यास त्वचेची जळजळ होऊ शकते. तसेच केस कोरडे पडू शकतात. त्यामुळे आज आपण होळीचा पक्का रंग सुरक्षितपणे आणि सहज कसा काढायचा, यासाठी काही उपाय जाणून घेणार आहोत.

3 / 10
होळीला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. सर्वत्रच प्री-होळी सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. तुम्हीही होळी खेळण्यासाठी उत्सुक असाल तर रंग काढण्याच्या उपायांपेक्षा, त्वचेला जास्त रंग लागू नये याची काळजी घेणे केव्हाही उत्तम असते.

4 / 10
होळी खेळायला जाण्यापूर्वी संपूर्ण शरीराला आणि केसांना खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल भरपूर प्रमाणात लावा. यामुळे रंगांचा थर त्वचेच्या थेट संपर्कात येत नाही. तसेच रंग काढणे सोपे जाते. चेहऱ्यासाठी आणि ओठांसाठी पेट्रोलियम जेलीचा वापर करा.

5 / 10
जर रंग त्वचेवर बसला असेल, तर अंघोळीपूर्वी खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा मोहरीच्या तेलाने त्वचेवर चांगला मसाज करा. यामुळे रंग लवकर निघण्यास मदत होते.

6 / 10
जास्त रंग लागला असेल तर बेसन, दही, दूध आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळून एक घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट १५-२० मिनिटे लावून ठेवा. सुकल्यानंतर हलक्या हाताने घासून कोमट पाण्याने धुवून टाका.

7 / 10
जर तुम्हाला कोणी पक्का रंग लावला असेल तर तो काढण्यासाठी लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण त्वचेवर लावणे फायदेशीर ठरते. तसेच कोरफड जेलही उपयुक्त ठरते. यामुळे त्वचेला कोणतीही इजा होत नाही.

8 / 10
तसेच केसांवरील रंग काढायचा असेल तर केस धुण्यापूर्वी केसांना कोमट तेलाने मसाज करा. केस धुण्यासाठी सल्फेट फ्री किंवा सौम्य शॅम्पू वापरा. केसातील रंग काढण्यासाठी Apple Cider Vinegar आणि पाणी यांचे मिश्रण तयार करा आणि त्याने केस धुवा.

9 / 10
केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरणे अजिबात विसरू नका, यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. रंग काढण्यासाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नका, यामुळे रंग त्वचेवर निघण्याऐवजी तो अधिक जमा होतो.

10 / 10
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर लिंबाचा वापर करणे टाळा. तसेच अंघोळ झाल्यानंतर त्वचेवर लगेचच चांगले मॉइश्चरायझर किंवा लोशन नक्की लावा.

Follow Us