Easy Tips : कपड्यांवर पडलेत तेलकट डाग ? या सोप्या ट्रिक्सनी झटक्यात होईल साफ

कपड्यांवर लागलेले तेलाचे डाग खूप खराब दिसतात. तेलामुळे कपड्यांवर घाणही अधिक चिकटते. स्वयंपाक करताना किंवा स्वयंपाकघरात काम करताना कपड्यांवर तेलाचे डाग लागले, तर काही सोप्या घरगुती उपायांनी ते साफ करता येतात.

| Updated on: Sep 24, 2026 | 7:28 PM
1 / 7
तुम्ही घरात असलेल्या डिटर्जंटच्या मदतीने कपड्यांवरील तेलाचे डाग साफ करू शकता. जर कपड्यांवर तेल सांडलं असेल तर टिश्यू किंवा पेपर टॉवेलने ते हलकंच दाबून जास्तीचं तेल शोषून घ्या. (Image Source - iStock)

तुम्ही घरात असलेल्या डिटर्जंटच्या मदतीने कपड्यांवरील तेलाचे डाग साफ करू शकता. जर कपड्यांवर तेल सांडलं असेल तर टिश्यू किंवा पेपर टॉवेलने ते हलकंच दाबून जास्तीचं तेल शोषून घ्या. (Image Source - iStock)

2 / 7

मात्र डाग पडल्यावर कपडे जोरात घासण्याची चूक करू नका. असं केल्याने तेल कपड्यांच्या तंतूंमध्ये अधिक पसरू शकतं. त्याऐवजी ज्या ठिकाणी तेलाचा डाग लागला आहे, तिथे थोडं डिटर्जंट लावा आणि बोटांच्या मदतीने हलक्या हाताने चोळा. अशा प्रकारे तंतूंमध्ये गेलेले तेलही हळूहळू साफ होण्यास सुरुवात होते.

3 / 7

कपड्यांवरील तेलाचे डाग काढण्यासाठी तुम्ही डिश डिटर्जंटचाही वापर करू शकता. त्यामध्ये असलेले सर्फॅक्टंट तेल आणि ग्रीस तोडण्यास मदत करतात.

4 / 7

लॉन्ड्री डिटर्जंटमध्ये असलेले सर्फॅक्टंट आणि एन्झाइम्सही डाग साफ करण्यास मदत करतात. त्यामुळे तेलाचे डाग काढण्याचे काम सोपे होऊ शकते.

5 / 7

तुम्ही एखादा छोटा आणि मऊ ब्रशही वापरू शकता. थोडे कोमट पाणी घेऊन ज्या ठिकाणी तेल सांडलंय आहे तो भाग हलक्या हाताने स्वच्छ करा. कापड नाजूक असल्यास तो खूप वेगाने किंवा जास्त दाब देऊन चोळू नका. असं केल्याने कापड खराब होऊ शकतं.

6 / 7

जर तेलाचा डाग ताजा असेल, तर डिटर्जंट लावून कपडा सुमारे अर्धा तास तसाच ठेवू शकता. मात्र, जर कपडा आधीच सुकला असेल किंवा तेलाचा डाग जुना झाला असेल, तर कपडा डिटर्जंटच्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवता येतो. यामुळे डिटर्जंटला डागावर अधिक चांगल्या प्रकारे परिणाम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

7 / 7

(डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. टीव्ही9 मराठी या माहितीची पुष्टी करत नाही )

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us