
सध्या गुगल जेमिनी देशभरात चर्चेचा विषय आहे. गुललच्या या एआय टुलला दिलेल्या प्रॉम्प्टनुसार हे टुल तुम्हाला माहिती पुरवतं. विशेष म्हणजे याच टुलचा वापर करून सध्या तयार करण्यात येणारे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

गुगल जेमिनीला वेगवेगळे प्रॉम्प्ट देऊन काही फोटो तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड केले जातायत. विशेष म्हणजे या फोटोंना हजारोंनी लाईक्स मिळत आहेत. सध्या याच गुगल जेमिनीला नवरा-बायकोच्या भांडणाचा प्रश्न विचारल्यानंतर या एआय टुलने दिलेल्या उत्तराची सगळीकडे चर्चा होत आहे.

गुगल जेमिनीला बायको रागात असेल आणि नवरा-बायकोचे भांडण होत असेल तर काय करावे? भांडण कसे मिटवावे असे विचारण्यात आले. जेमिनीने या प्रश्नाचे उत्तर अवघ्या काही सेकंदात दिले आहे.

जेमिनीने सुचवल्यानुसार बायको रागात असेल आणि भांडण मिटवायचे असेल तर शांतता आणि संयम बाळगावा, आपल्या पत्नीच्या काय अडचणीत आहेत त्या समजून घ्याव्यात, असे जेमिनीने सुचवले आहे.

तसेच काही चुकले असेल तर पतीने ते मान्य करावे आणि आपल्या पत्नीशी योग्य पद्धतीने संवाद साधावा, असेही काही पर्याय जेमिनीने सुचवले आहेत. जेमिनी अशाच अनेक अडचणींवर चांगले उपाय सुचवते.