
नागरिकांच्या पैशासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

जर आपण नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारात असाल, तर लोणच्याचा बिझनेस (Pickle Business) हा एक चांगला मिळकत करणारा व्यवसाय आहे. पिकल मेकिंग बिझनेस (Business Idea) हा तुम्हाला घरातूनच सुरू करता येईल. हा व्यवसाय कसा सुरू करू आणि आपली कमाई किती असेल हे जाणून घेऊयात…

घरी लोणचे बनवण्याचा व्यवसाय केवळ 10 हजार रुपयांपासून सुरू करता येतो. यातून तुम्ही दरमहिना 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. ही मिळकत आपल्या उत्पादनाची मागणी, पॅकिंग आणि क्षेत्रावर देखील अवलंबून असते. तुम्ही लोणच्याची ऑनलाईन, घाऊक, किरकोळ बाजारात विक्री करु शकता.

लोणचं बनवण्याच्या व्यवसायासाठी 900 चौरस फूट क्षेत्र असणे आवश्यक आहे. लोणचं तयार करण्यासाठी, ते सुकवणं पॅक करणं यासाठी मोकळ्या जागेची गरज असते.

काही ठराविक दिवसांनी लोणच्याचे विविध प्रकार तुम्ही विक्रीसाठी ठेऊ शकता. सुरुवातीला बिझनेसचं चांगल मार्केटिंग केलं तर त्यामुळे तुम्हाला नफा होतो.

हा व्यवसाय दिसायला छोटा असाल तरीही त्याला कठोर परिश्रम आणि नवीन नवकल्पनांच्या माध्यमातून मोठा व्यवसाय बनवला जाऊ शकतो. या व्यवसायाचा नफा दरमहिन्याला प्राप्त होतो. तसेच यामुळे नफाही वाढत जातो.

महिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय