ना कोंब फुटणार, ना सडणार; घरच्या घरी कांदे साठवण्याचे सोपे घरगुती उपाय

कांदे लवकर सडतात किंवा त्यांना कोंब फुटतात का? या लेखात जाणून घ्या कांदे ताजे ठेवण्याच्या ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स, ज्यामुळे तुमची पैशांची बचत होईल.

| Updated on: Apr 28, 2026 | 5:21 PM
1 / 6
स्वयंपाकघरातील कोणत्याही पदार्थाची चव कांद्याशिवाय अपूर्ण असते. अनेकदा कांद्याचे दर वाढण्याच्या भीतीने आपण साठा करून ठेवतो, पण काही दिवसांतच त्यांना कोंब फुटतात किंवा ते खराब होतात. मग कांद्याची नासाडी टाळण्यासाठी किंवा ते दीर्घकाळ टिकावे, यासाठी काय करावे हे आपण जाणून घेऊया.

स्वयंपाकघरातील कोणत्याही पदार्थाची चव कांद्याशिवाय अपूर्ण असते. अनेकदा कांद्याचे दर वाढण्याच्या भीतीने आपण साठा करून ठेवतो, पण काही दिवसांतच त्यांना कोंब फुटतात किंवा ते खराब होतात. मग कांद्याची नासाडी टाळण्यासाठी किंवा ते दीर्घकाळ टिकावे, यासाठी काय करावे हे आपण जाणून घेऊया.

2 / 6

कांदे ताजे राहण्यासाठी त्यांना सतत कोरड्या हवेची गरज असते. बाजारातून आणल्यानंतर कांदे कधीही प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका; यामुळे ओलावा साचून ते लवकर सडतात. त्याऐवजी कांदे जाळीदार पिशवी, बांबूची टोपली किंवा छिद्र असलेल्या ट्रेमध्ये पसरवून ठेवा. यामुळे त्यांची साल कोरडी राहते. तसेच जिवाणूंची वाढ होत नाही.

3 / 6

बऱ्याचदा आपण जागा वाचवण्यासाठी कांदे आणि बटाटे एकाच टोपलीत ठेवतो, पण ही चूक टाळा. बटाट्यांमधून नैसर्गिकरित्या इथिलीन वायू आणि ओलावा बाहेर पडतो, ज्यामुळे कांद्यांना लवकर कोंब फुटतात आणि ते मऊ पडतात. कांदे आणि बटाटे नेहमी एकमेकांपासून स्वतंत्र ठेवावेत.

4 / 6

कांदे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील ओलावा आणि थंडीमुळे कांद्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते. यामुळे कांदा मऊ आणि चिकट होतो. अखंड कांदे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. मात्र, जर कांदा कापलेला असेल, तर उरलेला तुकडा हवाबंद डब्यात ठेवून तुम्ही तो फ्रीजमध्ये साठवू शकता.

5 / 6

कांद्यांना थेट सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांना अंकुर फुटू लागतात. त्यामुळे ते नेहमी थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी साठवावेत. खिडकीजवळ किंवा सिंकच्या खाली जिथे दमटपणा असतो, अशा ठिकाणी कांदे ठेवू नका. कपाटाचा खालचा भाग किंवा अंधारी कोपऱ्यात ठेवल्यास ते जास्त काळ टिकतात.

6 / 6

जर तुमच्या घरात दमट हवामान असेल, तर कांदे छिद्र पाडलेल्या कागदी पिशवीत ठेवा. कागद अतिरिक्त ओलावा शोषून घेतो. त्यामुळे कांदे कोरडे ठेवण्यास मदत होते. तसेच, आठवड्यातून एकदा कांदे तपासा; जर एखादा कांदा खराब झाला असेल तर तो त्वरित बाहेर काढा, जेणेकरून इतर कांदे सुरक्षित राहतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us