Tukaram Mundhe: भेसळयुक्तांवर धाडधाड कारवाई करणारे तुकाराम मुंढे दररोज कोणतं पाणी पितात? तुम्हीही पाहा
संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात फक्त तुकाराम मुंढे यांचीच जोरदार चर्चा आहे, आता ते कोणतं पाणी पितात या संर्दभातील फोटो आता समोर आला आहे.

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यभरात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर एकामागोमाग कारवाई केली.

दुकान, हॉटेल आणि औषध बनवणाऱ्या कंपनी आता धासतावल्या आहेत. तुकाराम मुंढे दरदिवसी भेसळयुक्त पदार्थांची भेसळ बाहेर काढताना दिसतायेत.

मुंढेच्या या कामगिरीमुळे त्यांना अनेक कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून बोलावले जाते. या कार्यक्रमांमध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात त्याची ते बेधकडपणे उत्तरही देतात.

काल अशाच एका कार्यक्रमात मुंढेनी आपली उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

एका फोटोतून असं समजते की तुकाराम मुंढे यांचा बिसलेरीच्या पाण्यावर त्यातल्यात्या विश्वास असल्याचे दिसत आहे. कारण या कार्यक्रमात ते बिसलेरीच्या बोटलमधील पाणी पिताना दिसले.