IAS पल्लवी मिश्रा यांच्या लग्नाची तुफान चर्चा, पतीसुद्धा IAS, भाऊ SP तर वडील राहिलेले DSP, शाही विवाहाचे फोटो व्हायरल
पल्लवी 2023 सालच्या बॅचच्या आयएएस ऑफिसर आहेत. त्या सध्या अमृतसरमध्ये असिस्टंट कमिश्नर (ADC) आहेत. पल्लवी मिश्रा यांनी IAS ऑफिसर डॉ. आदित्य शर्मा यांच्याशी लग्न केलंय. ते MBBS डॉक्टर आहेत.

आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न देशातील कोट्यवधी तरुण-तरुणी पाहतात. परंतु फारच मोजक्या लोकांचे हे स्वप्न पूर्ण होते. म्हणूनच आयएएस झालेल्या व्यक्तीला समाजात वेगळा मान, सन्मान असतो. अशा अधिकऱ्यांचे करिअर तसेच वैयक्तिक आयुष्यही तेवढंच चर्चेत असतं. दरम्यान, सध्या दोन आयएएसच्या लग्नाची सगळीकडे चर्चा होत आहे.
IAS अधिकारी पल्लवी मिश्रा आणि IAS ऑफिसर डॉ. आदित्य शर्मा याचे 20 नोव्हेंबर रोजी लग्न झाले. पल्लवी मिश्रा यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून BA LLB (ऑनर्स) चे शिक्षण घेतलेले आहे. UPSC परीक्षेत त्यांना 2022 साली दुसऱ्या प्रयत्नात यश आले. त्यांना 73 वार रँक मिळाला होता.
पल्लवी 2023 सालच्या बॅचच्या आयएएस ऑफिसर आहेत. त्या सध्या अमृतसरमध्ये असिस्टंट कमिश्नर (ADC) आहेत. पल्लवी मिश्रा यांनी IAS ऑफिसर डॉ. आदित्य शर्मा यांच्याशी लग्न केलंय. ते MBBS डॉक्टर आहेत.
आदित्य शर्मा यांनी UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं. त्यांचा ऑल इंडिया रँक 70 होता. ते 2023 सालच्या बॅचचे पंजाब केडरमधील IAS अधिकारी आहेत. दोघांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. पल्लवी यांचा भाऊ हा एसपी आहे. तर त्यांचे वडील हे डीएसपी राहिलेले आहेत.
पल्लवी शर्मा यांनी काही तासांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर त्यांच्या विवाहाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना शेकडो लाईक्स आहेत. विशेष म्हणजे थाटामाटात झालेल्या या विवाह सोहळ्यात दोन्ही कुटुंबांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या विवाहाच्या फोटोंची सगळीकडेच चर्चा होत आहे.