
2015 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या टीना डाबी याचे नुकतेच महाराष्ट्राची सून झाली आहे. लातूरचे सुपुत्र IAS प्रदीप गावंडे यांच्या सोबत टीनाने विवाह केला आहे.

टीना डाबी व प्रदीप गावंडे पांढऱ्या रंगाचा पोशाख घातला आहे. लग्नातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. अनेक नेटकाऱ्यांनी हा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

IAS टीना डाबी व IAS प्रदीप गावंडे यांनी जयपूरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहसोहळा संपन्न झाली. टीना डाबी व प्रदीप गावंडे यांनी बौद्ध पद्धतीने विवाह केला आहे.

टीना डाबी व प्रदीप गावंडे यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या फोटो शेअर करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

2015मध्ये यूपीएससीच्या परीक्षेत प्रथम आल्यानंतर टी सर्वाधिक चर्चेत आली होती. पहिली दलित टॉपर होण्याचा मानही तिने मिळवला आहे. काही दिवसांपूर्वी टीना व प्रदीप यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या रिलेशनशीप खुलासा करत माहिती दिली होती.