U19 World Cup: सेमीफायनलमधला भारताच्या विजयाचा हिरो कॅप्टन यश धुलने विराट कोहलीला टाकलं मागे

| Updated on: Feb 03, 2022 | 12:33 PM

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत बुधवारी झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात करुन सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली.

1 / 4
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत बुधवारी झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात करुन सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. भारताच्या या विजयात कर्णधार यश धुलने शतकी खेळी करुन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (ICC)

2 / 4
यश धुल कठीण समयी फलंदाजीला आला व त्याने शेख रशीद सोबत तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. त्यामुळे संघाने 291 धावसंख्येपर्यंत मजल मारली. यशने 110 चेंडूत 110 धावा केल्या. यात 10 चौकार आणि एक षटकार होता.  (ICC)

3 / 4
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत शतक झळकावणारा यश धुल तिसरा कर्णधार आहे. यापूर्वी विराट कोहलीने 2008 आणि 2012 मध्ये उनमुक्त चंदने कर्णधार म्हणून शतक झळकावले होते. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये धावांच्या बाबतीत यश धुल कोहलीच्या पुढे आहे.  (unmukt Twitter)

4 / 4
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये कर्णधार म्हणून उनमुक्त चंदने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 111 धावांची खेळी केली होती. त्यानंतर यश धुलने 110 धावांची खेळी केली. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2008 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध फायनलमध्ये 100 धावा केल्या होत्या. (BCCI)