
आईसलँडची राजधानी रेकाविकपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेले ज्वालामुखी अचानक फुटलंय. तिथून लाल लावा वाहू लागला होता, ज्यामुळे आकाश लाल झाला ज्वालामुखीचे हे रात्रीचे फोटोही समोर आले आहेत. रेखनाइस द्वीपकल्पातील हा ज्वालामुखी मागील 800 वर्षांपासून शांत होता.

हे घडल्यानंतर आइसलँडिक मेटेरोलॉजिकल ऑफिसने ट्विट केले आहे की, 'फाग्राडाल्स्फॉलमध्ये आता ज्वालामुखीतून लाल रंगाचा लावा वाहू लागला आहे, परंतु नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. घटना शुक्रवारी रात्री 08:45 वाजताची आहे.

ज्वालामुखीच्या लावाची चमक 32 किलोमीटरच्या अंतरावरुन देखील पाहिली जाऊ शकते. हे ठिकाण निवासी क्षेत्रापासून बरेच दूर आहे. सर्वात जवळचा रस्ता देखील 2.5 मीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत हे क्षेत्र रिकामं करण्याची कोणतीही समस्या नाही. 781 वर्षांपासून रेकेनियस द्वीपकल्पात ज्वालामुखी फुटले नाहीत.

अलीकडेच येथे भूकंपाचे अनेक झटके जाणवले, त्यानंतर ज्वालामुखी फुटण्याची शक्यता तीव्र झाली होती. तरी, स्फोट होण्यापूर्वी भूकंपाची गतिविधी थांबली. पण तरीही ही घटना घडली ती आश्चर्यकारक आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून, 24 फेब्रुवारीला रेकजाविकच्या बाहेरील किलीर माउंटनजवळ भूकंप झाल्यामुळे या भागाचे निरीक्षण वाढले होते. त्या भूकंपाची तीव्रता 7.7 मोजली गेली. या भूकंपानंतरही असे अनेक भूकंप जाणवले. ज्वालामुखी फुटल्यामुळे आता लावा दोन बाजूंनी वाहत आहे.

खबरदारी म्हणून लोकांना घरांच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून हवेमध्ये वाहणार्या गॅसमुळे त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. आईसलँडमधील ज्वालामुखींबद्दल बोलताना, यावेळी 30 हून अधिक ज्वालामुखी सक्रिय आहेत आणि त्यामध्ये विलुप्त ज्वालामुखींचा समावेश आहे.

आईसलँड ज्या झोनमध्ये येतो त्या भागात, दोन खंड प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात. एका बाजूला उत्तर अमेरिकन प्लेट आहे, जी अमेरिकेला युरोपपासून दूर नेते. तर दुसर्या बाजूला युरेसियन प्लेट आहे, जी दुसर्या दिशेने खेचते. सन 1784 मध्ये येथे लाकी येथे स्फोट झाला आणि त्यामुळे दुष्काळ पडला. 2010 मध्येही ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यामुळे युरोपमधील हवाई वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.