
हिंदू धर्मात तुळस या झाडाला खूप महत्त्व आहे. तुम्ही अनेकदा अनेक घरांपुढे, खिडक्यांत तुळशीचे रोप पाहिलेले असेल. वास्तूशास्त्रानुसार घरात हिरवेगार तुळशीचे झाड असणे हे सकारात्मक उर्जेचे लक्षण असते.

परंतु अनेक घरांत तुळस लावली की ती वाळून जाते. म्हणूनच तुळशीचे झाड वाळून जाणे हे अपशकून किंवा एखाद्या नव्या संकटाचे लक्षण तर नाही ना? असे अनेकदा विचारले जाते. याच पार्श्वभूमीवर सुकलेली तुळस नेमका काय संकेत देते? ते जाणून घेऊया..

वास्तूशास्त्रानुसार घरात लावलेली तुळस सुकून गेली तर तुमच्या कुटुंबाला कोणाचीतरी नजर लागलेली आहे, असे समजावे. सुकलेली तुळस म्हणजेच घरात नकारात्मकतेचा प्रवेश असा त्याचा अर्थ काढता येतो. घरात असलेली तुळस सुकली तर तो पितृदोषाचा संकेत असतो, असेही म्हटले जाते.

घरातील सुकलेली तुळस वेळीच न काढून टाकल्यास तुम्हाला अनेक ठिकाणी तोटा होऊ शकतो. तुळशीचे झाड घरातून कचऱ्यात फेकून देणेही चुकीचे आहे. सुकलेली तुळस रुईमध्ये ठेवावी. त्यानंतर त्यावर तूप टाकून देवघरात ती जाळून टाकावी. यामुळे पुन्हा घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते, असे सांगितले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.