
मेक्सिको : मेक्सिकोच्या शेजारी जेवढे देश आहेत, त्या देशांमधल्या व्यक्तीने जर मेक्सिकोमधील व्यक्तीशी लग्न केले तर त्याला मेक्सिकोचे नागरिकत्व सहज मिळते. मात्र त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे कमीत कमी दोन वर्ष संबंधित व्यक्तींनी सोबत राहणाने आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही नागरिकत्त्वासाठी अर्ज करू शकता.

स्पेन: स्पेन या देशातील नागरिकत्व देखील तुम्हाला सहज मिळवता येते. यासाठी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुम्ही येथील व्यक्तीसोबत लग्न करून, एक वर्ष त्याच्यासोबत रहाणे बंधनकारक आहे. तसेच तु्म्हाला त्या वर्षाचा सरकारी कर देखील भरावा लागतो. त्यानंतर तुम्हाला तेथील नागरिकत्व मिळते.

जर्मनी : जर्मनी हा जगातील एक सुंदर असा देश मानला जातो. अनेकांची जर्मनीमध्ये जाऊन सेटल होण्याची इच्छा असते. मात्र त्यासाठी तुम्हाला येथील व्यक्तीसोबत लग्न करावे लागेत. तुम्ही तीन वर्ष एकत्र राहिल्यानंतर नागरिकत्वासाठी अर्ज करू शकता. यासोबतच जर तुम्हाला जर्मनीचे नागरिकत्व मिळवायचे असेल तर तुम्हाला जर्मन भाषा येणे देखील बंधनकारक आहे.

नेदरलँड : या देशाचे जर तुम्हाला नागरिकत्व हवे असेल तर तुम्हाला येथील व्यक्तीसोबत लग्न करून, सुमारे तीन वर्ष एकत्र रहावे लागेल. त्यानंतरच तुम्ही नागरिकत्त्वसाठी अर्ज करू शकता. यासोबतच तुम्ही जर लग्न न करता या देशात पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून राहात असाल तरी देखील तुम्हाला नागरिकत्व मिळू शकते.

ब्राझिल : ब्राझिल या देशातील नागरिकत्व मिळवणे सर्वात सोपे आहे. तुम्ही येथील व्यक्तीसोबत लग्न करून एक वर्षांपेक्षा अधिक काळ एकत्र राहिलात तर तुम्हाला नागरिकत्व मिळते.