रोज घडत असतील या गोष्टी तर समजा नशिबाने दार उघडलं, आयुष्यात चांगले दिवस आलेच!
परंतु ज्योतिषशास्त्रात काही संकेत दिलेले आहेत. हे संकेत दिसताच तुमचे नशीब बदलणार आहे, असे मानले जाते. काहीही कारण नसता तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल भविष्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता वाटत असेल तर लवकरच तुम्ही आयुष्यात पुढे पाऊल टाकण्याची गरज आहे, असे समजावे.

कधीकधी आयुष्यात असे काही प्रसंग येतात की कितीही प्रयत्न केला तरीही यश काही येत नाही. नशिबी फक्त आपयशच येते. त्यामुळे आता माझ्या आयुष्यात कधीच काहीही होऊ शकत नाही, असेही आपल्याला अनेकदा वाटते.

परंतु ज्योतिषशास्त्रात काही संकेत दिलेले आहेत. हे संकेत दिसताच तुमचे नशीब बदलणार आहे, असे मानले जाते. काहीही कारण नसता तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल भविष्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता वाटत असेल तर लवकरच तुम्ही आयुष्यात पुढे पाऊल टाकण्याची गरज आहे, असे समजावे. लवकरच तुमच्या आयुष्यात नवं काहीतरी चांगलं येण्याची शक्यता असते.

तुम्हाला नेहमीच तुमच्या आसपास मोरपंख दिसत असेल तर हा एक शुभ संकेत आहे. सकाळी-सकाळी तुम्हाला मंदिराचा घंटानाद ऐकायला येत असेल तर हा शुभसंकेत मानावा. तुमच्या आयुष्यात असे घडत असेल तर लवकरच तुमचे जीवन बदलणार आहे, असे समजावे.

तुमचा अध्यात्माकडे ओढा वाढत असेल किंवा तुम्हाला मंदिरात जायला, ध्यान करायला आवडत असेल तर लवकरच तुमच्यासोबत काहीतरी वेगळं होणार आहे, असे मानावे. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक उर्जा निर्माण होते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.