
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मलायका अरोराचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.

विशेष म्हणजे मलायका अरोरा आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना दिसते. मलायका अरोरा ही कायमच हेल्दी फूड आणि व्यायाम करण्यावर अधिक भर देते.

विशेष म्हणजे मलायका अरोरा सकाळी उठल्यावर अत्यंत खास असे ड्रिंक घेते. हेच ड्रिंक तिच्या फिटनेसचे राज असल्याचे देखील सांगितले जाते.

ओव्याच्या पाण्याने मलायका अरोरा आपल्या दिवसाची सुरूवात करते. रात्री ओवा पाण्यात भिजत घालायचा आणि सकाळी तो उकळून त्याचे पाणी प्यायचे.

यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते आणि भूकही लागत नाहीत. हे ओव्याचे ड्रिंक आपल्या आरोग्यासाठी आणि फिट राहण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.