
अनेकदा अचानक टॉयलेटचा रंग बदलतो. मात्र, याकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र, टॉयलेटचा रंग बदलण्याचे मोठे संकेत आहेत. जेव्हा शौच हलक्या रंगाचे, मातीसारखे दिसते, तेव्हा ते पित्त हाताळणाऱ्या प्रणालीशी संबंधित असू शकते.

यामध्ये यकृत आणि स्वादुपिंड यांचा समावेश होतो. पित्तामुळे शौचाचा रंग तपकिरी असतो. यकृत पित्त तयार करते, जे पित्तनलिकांद्वारे आतड्यांपर्यंत पोहोचते. पचन प्रक्रियेदरम्यान त्याचा रंग बदलतो.

यामध्ये काही गडबड झाली की, शौचाचा रंग बदलतो. पित्ताशयातून पित्ताचा प्रवाह थांबण्याची अनेक कारणे असू शकतात. यकृतातील सूज किंवा संसर्गामुळे पित्ताचे उत्पादन कमी होते.

जर टॉयलेटचा रंग फिकट दिसत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यामध्येही तुम्हाला खाज, गडद रंगाची लघवी आणि सतत थकवा येत असेल तर लगेचच डॉक्टारांना दाखवणे फायदेशीर ठरते.

कधीतरी फिकट टॉयलेट येत असेल तर ठीक आहे. मात्र, सतत ही समस्या असेल तर हे आरोग्यासाठी नक्कीच घातक आहे. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधणे फायदेशीर ठरते.