
यावेळी राजस्थानमधील जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या IIFA अवॉर्ड्स 2025 मध्ये रेखा यांच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं. सध्या त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

नेहमी प्रमाणे यावेळी देखील रेखा त्यांच्या पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर त्यांच्या रॉयल लूकच्या चर्चा रंगल्या आहेत.

रेखा यांनी सोनेरी बनारसी सिल्क साडी घातली होती. पारंपारिक दागिने, गजरा आणि सिंदूरमध्ये रेखा अधिक सुंदर दिसत होत्या. आजही रेखा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

रेखा यांचे ग्लॅमरस फोटो पाहिल्यानंतर वय फक्त एक आकडा आहे.... हे पुन्हा सिद्ध झालं आहे. रेखा आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, रेखा आता बॉलिवूडपासून दूर असल्यातरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.