हनुमानाच्या मंदिराच्या कळसावरुन नोटांची बरसात, नोटांना पकडण्यासाठी भाविकांची झुंबड

अकोला जिल्हातल्या मनारखेड गावात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यात चक्क मंदिराच्या कळसावरून नोटांची उधळण झाली. या नोटा वेचण्यासाठी भाविकांची अक्षरश: झुंबड उडाली !

| Updated on: Feb 23, 2026 | 8:01 PM
1 / 5
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या मनारखेड गावात एक आज अजब आणि धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. या गावात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापणा झाली. मात्र त्यानंतर जे झाले त्याने गाव चकीत झाले.

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या मनारखेड गावात एक आज अजब आणि धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. या गावात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापणा झाली. मात्र त्यानंतर जे झाले त्याने गाव चकीत झाले.

2 / 5

मनारखेड गावात आज हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर मंदिराच्या कळसावरून चक्क नोटांची उधळण करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

3 / 5

गावातील मंदिरावरून हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटांची उधळण कारण्यात आली. यासोबतच 5 आणि 10 रुपयांचे नाणीही यावेळी उधळण्यात आले आहेत.

4 / 5

नोटांची उधळण झाली त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या भाविकांनी नोटा वेचण्यासाठी एकच झुंबड केली.तर त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.नोटांना पकडण्यासाठी काहींनी थेट मंदिरात उभारलेल्या मंडपावर चढण्याचाही प्रयत्न केला.

5 / 5

काहीजण वाऱ्याच्या दिशेने उडणाऱ्या नोटा पकडण्यासाठी सैरावैरा धावत सुटले तर त्यामुळे काही काळ चेंगराचेंगरी होते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली.भाविकांनी जमा केलेल्या ते आता आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us