
जगप्रसिद्ध पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणार शहरातील प्रमुख मार्गसह बायपास मार्गावर तसेच शहरातून गेलेला प्रमुख शेगाव- पंढरपूर महामार्ग आणि बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरताना दिसतात.

तर काही ठिकाणी रस्त्यावरच जनावरे बसलेली असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

यामुळे अनेकवेळा अपघात ही झाले आहेत, मात्र याकडे स्थानिक नगर पालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसतेय.

याठिकाणी लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्याची संख्या मोठी असते, मात्र या रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे बिनधास्त बसलेली आढळत असल्याने वाहन धारकांना याचा त्रास सहन करावा लागतो.

शिवाय लोणार शहरातील गल्लीबोळात गावठी डुक्कर, कुत्रे आदींचा सुद्धा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या रहदारीच्या रस्त्यावरील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी लोणार शहरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.