
टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील सामना गुरूवारी संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. हा बार्बाडोसमधील किंग्स्टन ओव्हल या मैदानावर होणार आहे. टीम इंडियासमोर अफगाणिस्तान संघाचं आव्हान असणार आहे.

अफगाणिस्तान संघाला कमी लेखून चालणार नाही. कारण त्यांच्या संघामध्ये अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. त्यातील काही भारतात आयपीएलही खेळतात. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये भारताला मागील सामन्यात केलेल्या चुका टाळाव्या लागणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोहलीला फॉर्ममध्ये यावं लागणार आहे.

विराट कोहलीची बॅट जास्त दिवस शांत राहणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे. हाच विश्वास इरफान पठाण यालाही आहे.

विराट कोहलीची बॅट जास्त दिवस शांत राहणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे. हाच विश्वास इरफान पठाण यालाही आहे. इरफानने कोहलीबाबत बोलताना, तो एक मोठा खेळाडू असून मला खात्री आहे की तो मोठ्या सामन्यामध्ये नक्की खेळेल. न्यूयॉर्कमधील परिस्थिती वेगळी होती आणि तुम्हाला तो खरा विराट कोहली दिसेल, असं इरफान पठाण याने म्हटलं आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज