IND vs NZ: भारताच्या ‘त्या’ दोघांनी किवींना मॅच विकून टाकली, 7 ओव्हरमध्ये टीम इंडिया कशी मॅच हरली?
IND vs NZ Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका सुरु असून चौथा सामना भारतीय संघाला गमवावा लागला. आता भारतीय संघाच्या पराभवामागे सामन्यातील सातवी ओव्हर असल्याचे म्हटले जात आहे,

सलग तीन टी२० सामने जिंकल्यानंतर ईडेन पार्कवर टीम इंडियाला चौथ्या टी२० सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा ८७ धावांनी चौथ्या टी-२० मध्ये पराभव झाला. पण भारतीय संघाने एवढ्या मोठा फरकाने सामना गमावण्यामागे एक कारण समोर आले आहे.
टीम इंडियाचा पराभव हा मॅचमधील सातव्या ओव्हरमुळे झाल्याचे दिसत आहे. सामन्यात नितीश रेड्डी आणि अक्षर पटेल हे दोन्ही बॉलर न्यूझीलंडविरुद्ध फेल ठरले. नितीशने आज 4 ओव्हरमध्ये 64 धावा देऊन 1 विकेट काढली. तर अक्षर पटेलने 3 ओव्हरमध्ये 43 धावा लुटल्या. अशा प्रकारे एकूण सात ओव्हरमध्ये टीम इंडियाने मॅच गमावली.
टीम इंडियात सध्या हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट म्हणून नितीश रेड्डी आणि अक्षर पटेल हे दोन ऑलराऊंडर खेळत आहे. त्यातल्या नितीश रेड्डी मागच्या एका सामन्यात तिलक वर्मासोबत टीम इंडियाला सामना जिंकवून दिला होता. पण बॉलिंगमध्ये तो फारशी इमपॅक्ट फूल कामगिरी करु शकत नाहीये.
भारतीय संघाचे फलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत आहे पण गोलंदाज मात्र फेल ठरत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय वारंवार प्रयत्न करत आहे