
पहिला टी-20 सामना ब्रायन लारा स्टेडियम, तारुबा, त्रिनिदाद इथे होणार असून दोन्ही संघांचा मालिकेची विजयाची सुरूवात करण्याचा प्रयत्न असणार आहेत.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या सामन्यातीस प्लेइंग 11 मध्ये हार्दिक पंड्या कोणाला संधी देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संघामध्ये तीन खेळाडू असे आहेत जे आज डेब्यू करताना दिसू शकतात.

यशस्वी जयस्वाल आजच्या सामन्यामध्ये डेब्यू करताना दिसू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना शतक ठोकणाऱ्या यशस्वीला टी-२० मध्ये पंड्या आज संधी देतो की नाही हे पाहावं लागणार आहे.

दुसरा खेळाडू म्हणजे मुकेश कुमार असून त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी आणि वन डेमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामुळे आता टी-२० सामन्यातही त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

तिसरा खेळाडू म्हणजे ज्याला भावी युवराज सिंग म्हणून ओळखलं जातं. हा खेळाडू म्हणजे तिलक वर्मा आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याने संघात एन्ट्री केलीये.