PHOTO | IND vs AUS 2020: भारतानं एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा घेतला बदला, दुसऱ्या टी-20 सह मालिका जिंकली
टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात (India vs Australia 2020 2nd T20) ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने टी 20 मालिका जिंकली.

- टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या टी-20 मालिकेत 6 विकेट्सने शानदार विजय मिळवत एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा बदला घेतला आहे. या विजयासह टीम इंडियाने टी 20 मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
- ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 2 चेंडूआधी पूर्ण केलं. टीम इंडियाकडून शिखर धवनने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 22 चेंडूत नाबाद 42 धावांची निर्णायक खेळी केली.
- केएल राहुलने 22 चेंडूत 2 फोर आणि 1 सिक्ससह 30 धावांची खेळी केली. राहुल बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. धवन-कोहली जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 38 धावा जोडल्या. कर्णधार विराट कोहलीनेही 40 धावा केल्या.
- विराट कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी विजयी भागीदारी केली. हार्दिक आणि श्रेयसने पाचव्या विकेटसाठी नाबाद 46 धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्याने 42 तर श्रेयस अय्यरने नाबाद 12 धावा केल्या.
- टीम इंडियाला सामन्यासह मालिका विजयासाठी अखेरच्या 3 षटकांमध्ये 37 धावा आवश्यक होत्या. 18 व्या षटकात अय्यर ने जैम्पाच्या गोलंदाजीवर एक षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात भारतानं 12 धावा केल्या.
- 19 व्या षटकात हार्दिक पांड्याला पहिल्या तीन चेंडूवर मोठे फटके लगावण्यात अपयश आले. त्यानंतर त्यानं सलग दोन चेंडूवर दोन चौकर लगावले. अखेरच्या षटकात डॅनियल सॅम्सच्या दोन चेंडूवर सलग दोन षटकार खेचत पांड्यानं भारताचा मालिका विजय पक्का केला.
- टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. ऑस्ट्र्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक धावा केल्या. वेडने 32 चेंडूत 10 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 58 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 46 धावा केल्या.







