
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तीन सामन्यांच्या सीरीजमधील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले होते. दोन्ही सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने सीरीज जिंकली होती. मात्र शेवटच्या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला.

भारताला ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 352 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ उतरल्यावर संघाची कडक सुरुवात झालेली. मात्र ग्लेन मॅक्सवेल याने सर्वाधिक चार आणि त्याही महत्त्वाच्या विकेट्स घेत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवला.

ग्लेन मॅक्सवेल याने वॉशिंग्टन सुंदर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना माघारी पाठवत भारताच्या बॅटींगमधील हवा काढून टाकली. रोहितने सर्वाधिक 81 धावा केल्या होत्या तर विराटनेही अर्धशतकी खेळी होती मात्र तोसुद्धा मॅक्सवेलच्या जाळ्यात सापडला.

सामना संपल्यानंतर प्रेझेंनटेशवेळी ग्लेन मॅक्सवेल याला सामनावीर म्हणजेच 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. या मालिकेतील प्लेअर ऑफ द सीरीज शुबमन गिल याला देण्यात आला.

शुबमन गिल तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये अंतिम ११ मध्ये खेळायला नव्हता. मात्र गिल या मालिकेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. गिलने दोन सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतकाच्या मदतीने 178 धावा केल्या आहेत.