IND vs NZ : अर्शदीप सिंहने न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात 3 वर्ल्ड रेकॉर्ड मोडले, बुमराहलाही जे जमलं नाही ते करुन दाखवलं
IND vs NZ : न्यूझीलंडने चौथ्या टी20 सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 259 धावासंख्या उभारली आहे. याच सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने तीन मोठे वर्ल्ड रेकॉर्ड मोडले आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंहने एक खास टप्पा गाठला आहे. अर्शदीप सिंहने न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरची विकेट काढून टी20 इंटरनॅशनलमध्ये 150 विकेट पूर्ण केले. (PC-PTI)
टी20 इंटरनॅशनलमध्ये 150 विकेट घेणारा अर्शदीप सिंह पहिला भारतीय आहे. अर्शदीप नंतर जसप्रीत बुमराहच्या नावावर 126 विकेट आहेत. सोबतच अर्शदीप सिंहने तीन आणखी मोठे वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. (PC-PTI)
अर्शदीप सिंह एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त टी20 इंटरनॅशनल विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. अर्शदीप सिंहने चालू वर्षात 40 विकेट काढलेत. वर्ष 2022 मध्ये जॉश लिटिलने 39 विकेट झटकलेले. (PC-PTI)
अर्शदीप सिंह सर्वात कमी चेंडूत 150 विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. अर्शदीप सिंहने फक्त 2143 चेंडूत 150 विकेट पूर्ण केलेत. इतक्या वेगाने मुस्तफिजुर रहमानने 150 टी20 इंटरनॅशनल विकेट घेतले होते. पण त्यासाठी त्याला 2532 चेंडू लागलेले. (PC-PTI)
अर्शदीप सिंहने डेब्यूच्या 1577 दिवसानंतर टी20 इंटरनॅशनलमध्ये 150 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याच्याआधी वानिंदु हसारंगाच्या नावावर हा रेकॉर्ड होता. त्याने 2325 दिवसात 150 विकेट पूर्ण केलेले. (PC-PTI)