IND vs NZ : गावस्करांपासून सर्व एक्सपर्ट्स बरोबर तर बोलले, गंभीरचं एका खेळाडूवरचं विशेष प्रेम टीम इंडियाला भोवलं, फायद्याऐवजी नुकसान जास्त

IND vs NZ 1st Test : भारत आणि न्यूझीलंडमध्ये वेलिंग्टन येथे पहिला कसोटी सामना सुरु आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांच्या ओपनिंगमुळे टीम इंडियाला चांगली स्टार्ट मिळाली आहे. पण गंभीर यांच्या निर्णयांमुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत.

| Updated on: Nov 20, 2026 | 11:31 AM
1 / 5
टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्या संघ निवडीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी जो संघ निवडण्यात आला, त्यावर बरीच चर्चा, वादविवाद झाले. सुनील गावस्करांपासून क्रिकेट विश्वातील एक्सपर्ट्सनी सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले.

टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्या संघ निवडीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी जो संघ निवडण्यात आला, त्यावर बरीच चर्चा, वादविवाद झाले. सुनील गावस्करांपासून क्रिकेट विश्वातील एक्सपर्ट्सनी सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले.

2 / 5

कॅप्टन शुबमन गिल आणि हेड कोच गौतम गंभीर यांनी संघ निवडताना काही निर्णय घेतले, जे चुकीचे ठरले असं वाटतय. गिल-गंभीर जोडीने अनुभवी मोहम्मद सिराज आणि फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाला टीममधून ड्रॉप केलं. हे निर्णय चुकीचे ठरले आहेत.

3 / 5

मोहम्मद सिराज आणि रवींद्र जाडेजाला बेंचवर बसवून गौतम गंभीर यांनी प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदरला पसंती दिली. पण हे दोघेपण गोलंदाजीत प्रभाव पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. या उलट मोहम्मद सिराज आणि जाडेजा टीम मध्ये असते तर त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला असता.

4 / 5

प्रसिद्ध कृष्णाने 26 ओव्हरमध्ये 100 धावा देऊन एक विकेट काढला. दोन मेडन ओव्हर त्याने टाकल्या. वॉशिंग्टन सुंदरने 20 ओव्हर टाकल्या. त्याने 45 धावा दिल्या. पण एकही विकेट काढला नाही. याऐवजी सिराज आणि जाडेजाचा अनुभव जास्त फायदेशीर ठरला असता.

5 / 5

न्यूझीलंडचा पहिला डाव 368 धावांवर आटोपला. पहिल्यादिवशी न्यूझीलंडची स्थिती 5 बाद 70 होती. हेनरी निकोल्स (175) धावा आणि ग्लेन फिलिप्स (118) यांच्या 216 धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडची धावसंख्या 350 पार गेली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us