
ट्वेंटी- 20 वर्ल्ड कप विजेता भारतीय संघ आज (गुरुवारी) सकाळी नवी दिल्ली इथं पोहोचलं. बार्बाडोस इथं आलेल्या वादळामुळे भारतीय संघ तीन दिवसांपासून अडकलं होतं. अखेर बुधवारी ते विशेष विमानाच्या साहाय्याने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत दाखल होताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीम इंडियाच्या भेटीचे आतील फोटो समोर आले आहेत. 7, लोक कल्याण मार्ग इथल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट आयोजित करण्यात आली. यावेळी संपूर्ण टीम जर्सीमध्ये तिथे पोहोचली.

या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंसोबत गप्पा मारल्या. टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड यांनीसुद्धा आपला अनुभव सांगितला.

गप्पांदरम्यान मोदी आणि खेळाडूंमध्ये मस्करीही झाली. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य या रंगतदार चर्चेचा साक्षी आहे. खेळाडूंनी आपापला अनुभव आणि अविस्मरणीय आठवण मोजक्या शब्दांत सांगितले.

वर्ल्ड कपच्या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विजयी झाल्यानंतर मैदानावरच त्याला अश्रू अनावर झाले होते. मोदींसमोर त्याने या विजयाचा अनुभव सांगितला.

सर्व खेळाडूंसोबत गप्पा मारताना आणि त्यांचे अनुभव ऐकताना पंतप्रधान नरेंद्र मोदी..

अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मोदींसमोर हार्दिकसुद्धा सामन्याबद्दल व्यक्त झाला.

संपूर्ण टीम इंडियाने वर्ल्ड कप हाती घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो क्लिक केला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हे क्षण अत्यंत खास आणि मोलाचे आहेत.