आता होणार पेट्रोल, डिझेल स्वस्त? सरकारने तो ऐतिहासिक निर्णय घेऊन टाकला, दिवाळीच्या दिवशीच खुशखबर!

युद्ध तसेच इतर कारणांमुळे भारतातील इंधन महागते. हाच प्रकार पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून भारताच्या इंडियन ऑइल या सरकारी तेल कंपनीने मोठा निर्णय घेतलाय.

| Updated on: Nov 08, 2026 | 8:06 PM
1 / 5
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा भारताला जबर फटका बसला. युद्ध सुरू असताना भारतात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजीची किंमत प्रचंड वाढली होती. अजूनही या दोन्ही देशांतील तणाव निवळलेला नाही.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा भारताला जबर फटका बसला. युद्ध सुरू असताना भारतात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजीची किंमत प्रचंड वाढली होती. अजूनही या दोन्ही देशांतील तणाव निवळलेला नाही.

2 / 5

युद्ध तसेच इतर कारणांमुळे भारतातील इंधन महागते. हाच प्रकार पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून भारताच्या इंडियन ऑइल या सरकारी तेल कंपनीने मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे भविष्यात तेलाच्या किमती नियंत्रणात राहू शकतात. कदाचित तेलाची किंमतही कमी होऊ शकते.

3 / 5

इंडियन ऑईल या कंपनीचे वित्त संचालक अनुज जैन यांनी याबाबत माहिती दिलीय. या माहितीनुसार इंडिय ऑईल ही कंपनी आपल्या स्वत:चे तेल टँकर, जहाज खरेदी करणार आहे. कच्चे तेल तसेच एलपीजीची वाहतूक करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल.

4 / 5

या जहाज, टँकर खरेदीसाठी निविदादेखील निघाली आहे. आता तेल कंपनी इंधनाच्या फक्त खरेदीवर नव्हे तर वाहतुकीवरही लक्ष देत आहे. या कंपनीकडे स्वत:चे तेल टँकर, तेलवाहू जहाज असतील तर वाहतूक खर्च कमी होऊ शकते.

5 / 5

वाहतूक खर्च कमी झाला तर देशात पेट्रोल, डिझेल तसेच इतर इंधनाच्या किमती नियंत्रित राहू शकतात. महागाई म्हणावी तेवढी वाढणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जातोय. भारताला या निर्णयाचा फायदा होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us